जिल्हाधिकारी कार्यालयात इंदिरा गांधी यांना अभिवादन; राष्ट्रीय एकात्मता शपथ

 




अकोला, दि.१(जिमाका)- दिवंगत माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात  त्यांच्या प्रतिमेस पूष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेची शपथही घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, अधीक्षक मिरा पागोरे तसेच अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते. प्रतिमापूजन करुन श्रीमती गांधी यांना अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथही यावेळी घेतली. यावेळी मोहन साठे, दत्तू जुमडे, अकोल पवार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य कर्मचारी- अधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम