विधान परिषद स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; नामनिर्देशन पत्र मंगळवार(23)पर्यंत दाखल


अकोला,दि.16(जिमाका)-  निवडणूक आयोगाने अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र दि. 16 ते 23 नोव्हेंबरपर्यंत शासकीय सुटीचे दिवस वगळून सकाळी 11 ते 3 वाजेपर्यत निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे दाखल करावे, असे अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी  कळविले आहे.

नागनिर्देशनाकरीता कागदपत्रे : नामनिर्देशन सादर करतांना नमुना 2 ई नामनिर्देशनसोबत विहीत नमुन्यातील प्रतिज्ञालेख (नमुना26) नोटरी केलेली असावी, अनामत रक्कम 10 हजार रुपये, अनुसूचित जाती-जमातीचे उमेदवाराकरीता पाच हजार रुपये राहिल. अनुसूचति जाती-जमातीचे असल्याबाबत पुरावा सादर करणे आवश्यक, उमेदवार ज्या मतदारसंघातील मतदार आहे त्या मतदारसंघातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदार यादीची प्रमाणित प्रत, अलीकडील पासपोर्ट(2x2.5सेमी) आकाराचे दोन फोटो व फोटोच्या मागील बाजुस उमेदवारांची स्वाक्षरी असणे आवश्यक, मानत्या प्राप्त किंवा नोंदणीकृत पक्षातर्फे नामनिर्देशनापत्र सादर करतांना फार्म एए व फार्म बी सादर करावे.तसेच नामनिर्देशनपत्रावर दहा सुचकांची स्वाक्षरी घेणे आवश्यक राहील.   

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचे वेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे 100 मीटर परिसरात फक्त तीन वाहन तसेच पाच व्यक्तींना प्रवेश अनुज्ञेय राहिल, असे पत्राव्दारे कळविले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम