कोविडः आरटीपीसीआरमध्ये शुन्य पॉझिटीव्ह, दोन डिस्चार्ज; रॅपिड ॲटिजेनमध्ये एक पॉझिटीव्ह
अकोला,दि.11(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग
तपासणीचे (आरटीपीसीआर) 279 अहवाल प्राप्त झाले. त्यात
कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.
तर दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय
व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.10) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह
आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57891(43280+14434+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक = एकूण पॉझिटीव्ह एक.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त
माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 330599 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 326961 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे
3236 नमुने होते. आजपर्यंत
एकूण 330599 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह
अहवालांची संख्या 287319 आहे, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शुन्य पॉझिटीव्ह
आज दिवसभरात आरटीपीसीआरमध्ये
कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह
आला. याची नोंद घ्यावी.
दोन डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात दोघांना होम आयसोलेशन येथुन डिस्चार्ज देण्यात आले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी दिली.
11 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57891(43280+14434+177) आहे. त्यात 1139 मृत झाले आहेत. तर 56741 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 11
जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 174
चाचण्यात एक पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे.
यात काल (दि.10) दिवसभरात झालेल्या 174 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला,
अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात मुर्तिजापूर येथे चार, अकोला
महानगरपालिका येथे 133, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 26
चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, तर
हेगडेवार लॅब येथे 11 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे एकूण 174 चाचण्यात एकाचा अहवाल
पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा
रुग्णालयाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा