शहिद आनंद गवई यांची एक महिन्याची पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी


अकोला,दि.२४(जिमाका)- येथील शहिद आनंद गवई यांची एक महिन्याची पेन्शन  त्यांचे आई वडील यांनी  मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊ केली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे आज त्यांनी या रकमेचा धनादेश सुपूर्द केला. ३७ हजार ५५७ रुपयांचा हा धनादेश आज सकाळी  शहिद गवई यांची आई गोकर्णाबाई  व वडील शत्रुघ्न गवई यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना दिला. शहिद आनंद गवई हे सन २०१७ मध्ये शहिद झाले होते. त्यांची आज जयंती होती त्यानिमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ आई वडीलांनी हा धनादेश सुपूर्द केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना