आजही दिलासाः आजअखेर फेरतपासणीत १२ पैकी ११ निगेटीव्ह, एक पॉझिटीव्ह आजच्या २१ अहवालांपैकी २०; तर आजअखेर २९१ निगेटीव्ह


अकोला,दि.१७ (जिमाका)- जिल्हावासीयांसाठी आजचा दिवसही दिलासा देणारा ठरला. आज एकूण २१ अहवाल प्राप्त झाले त्यातील  २० अहवाल निगेटीव्ह आले.  त्यात फेरतपासणीचे सहा अहवाल होते त्यापैकी एक फेरतपासणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. हा अहवाल बैदपूरा येथील तीन वर्षीय बालकाचा आहे. हा बालक  दि.७ रोजी जिल्ह्यात आढळलेल्या पहिल्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या कुटूंबातील आहे. तो यापूर्वीच्या चाचणीतही पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे हे विशेष त्यामुळे पॉझिटीव्ह रूग्ण संख्येत कुठलीही वाढ झालेली नाही. दरम्यान जिल्ह्यात सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या  पॉझिटीव्ह १२ जणांपैकी ११ जणांचे फेरतपासणीतील अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत, ही बाब स्पष्ट झाली आहेतसेच आजअखेर  ७५ अहवाल प्रलंबित आहेत. त्यात ६३ प्राथमिक तर १२ फेरतपासणीचे नमुने आहेत,असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात आज सायंकाळी पाच वाजेअखेर एकूण ३७५ नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३०९, फेरतपासणीचे ५९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३ नमुने होते. त्यापैकी आज २१ अहवाल प्राप्त झाले. त्यात २० निगेटीव्ह व एक पॉझिटीव्ह आढळला. आजपर्यंत एकूण ३०६ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २५३ तर फेरतपासणीचे ४६ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे सात अहवाल आहेत.
प्राथमिक तपासणीतल्या २५३ अहवालांपैकी २३९ निगेटीव्ह आहेत. तर फेर तपासणीतल्या ४६ अहवालांपैकी  ४५ निगेटीव्ह व एक पॉझिटीव्ह आला आहे. तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे सातही अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण २९१ निगेटीव्ह अहवाल आले आहेत.
आजपर्यंत १४ पॉझिटीव्ह रुग्णांचे एकूण १५ पॉझिटीव्ह अहवाल आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १४ तर फेरतपासणीचा एक यांचा समावेश आहे. या १४ रुग्णांपैकी दोन जण मयत असल्याने आता प्रत्यक्षात १२ रुग्ण आहेत. त्यात फेरतपासणीत ११ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर एका तीन वर्षीय बालकाचा फेरतपासणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. फेरतपासणीत अहवाल निगेटीव्ह आले असले तरी या रुग्णांना अजूनही उपचारांमधून जावे लागणार आहे. त्यानंतर पुन्हा त्यांच्या चाचण्या होऊन त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली रहावे लागणार आहे. आजअखेर जिल्ह्यात ७५ अहवाल प्रलंबित आहेत. त्यात ६३ प्राथमिक तर १२ फेरतपासणीचे नमुने आहेत. सद्यस्थितीत ८१ रुग्ण भरती आहेत.
आज जे २१ अहवाल प्राप्त झाले त्यात एक फेरतपासणीतील पॉझिटीव्ह आहे. तर अन्य १३ हे प्राथमिक अहवाल आहेत. तर उर्वरित पाच हे फेरतपासणीतील असून ते निगेटीव्ह आहेत.फेरतपासणीतील ज्या पाच जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत त्यात तिघे बैदपुऱ्यातील, एक पातूर येथील, एक मुर्तिजापूर येथील आहे. मुर्तिजापूर येथील संदिग्ध रुग्ण हा निगेटीव्हच होता मात्र तो थेट संपर्कातील असल्याने त्याची फेर तपासणी करण्यात आली आहे. तर उर्वरित दोघे हे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आहेत.
जिल्ह्यात आज अखेर ४२२ जण बाहेरुन आलेल्यांची संख्या आहे.  त्यापैकी ७० जण गृह अलगीकरणात तर ९५ जण संस्थागत अलगीकरणात असे एकूण १६५ जण अलगीकरणात आहेत. १७५ जणांची अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ