संचारबंदी दि.३ मे पर्यंत कायम;जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


अकोला,दि.१४ (जिमाका)- जिल्ह्यात दि.१४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लागू असलेली संचारबंदी रविवार दि.३ मे पर्यंत कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले आहेत. या आदेशांनुसार जिल्ह्यात सर्व जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व सेवा बंद राहतील.  या संचारबंदी आदेशातून औषधे, दूध, बॅंक व्यवहार, कृषी निविष्ठा व यंत्रसामुग्रीची प्रतिष्ठाने,  गॅस, पाणी, वीज पुरवठा इ. अत्यावश्यक सेवा पुर्वी दिलेल्या आदेशानुसार व त्या कालमर्यादेत सुरु राहतील. या आदेशाचा भंग केल्यास  भारतीय दंड संहिता १८६० चा ४५ च्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करुन  कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना