व्हीआरडीएल लॅबः आज ४२ नमुन्यांची तपासणी

अकोला,दि.१३ (जिमाका)- कोरोना विषाणू चाचणीसाठी व्हीआरडीएल लॅब ही कार्यान्वित झाली असून कामकाजाच्या दृष्टीने या लॅबचा कालचा पहिला दिवस होता. काल या लॅब मध्ये २५ नमुने तपासण्यात आले होते. तर आज ४२ नमुने तपासण्यात आले अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान अकोला जिल्ह्याचे नागपूर येथे प्रलंबित असलेले सॅम्पल्सही परत अकोल्याला पाठविण्यात आले असून त्यांचीही चाचणी आता अकोल्यातच होणार आहे. दरम्यान आज नव्याने जे सॅम्पल घेण्यात आले त्यात १६ हे अकोल्यातील असून दोन मात्र खामगाव येथील आहेत, अशीही माहिती देण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ