जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३ ;८७ पैकी १३९ जणांचे अहवाल प्राप्त, १२६ निगेटिव्ह; ४८ प्रलंबित


अकोला,दि.१० (जिमाका)- जिल्ह्यात आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या १३ झाली आहे. अकोला शहरातील एका संसर्गित रुग्णाच्या घरातील तीन  सदस्यांचे व अन्य एका रुग्णाचे असे चौघांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आता ही संख्या १३ वर पोहोचली आहे. आज दिवसभरात (गेल्या २४ तासात) ३५ जण संशयित रुग्ण म्हणुन दाखल झाले. त्यात पातूर येथे काल (दि.९) आढळलेल्या सात रुग्णांच्या  ३१ कुटूंबियांचाही समावेश आहे. या सगळ्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत १८७ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी १३९ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून १२६ निगेटिव्ह आहेत. तर १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
जिल्ह्यात आजतागायत प्रवासी म्हणून ३१६ जणांची नोंद झाली आहे. त्यातील ९५ जण अद्याप अलगीकरणात आहेत. (७८ जण गृह अलगीकरणात तर १७ जण संस्थागत अलगीकरणात) तर १३८ जणांचा गृह अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे. तर अहवाल प्रलंबित असलेले ६१ व त्यापूर्वीचे २१ जण असे ८२ जण विलगीकरण कक्षात वैद्यकीय निरीक्षणात आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ