बैदपूरा, अकोट फैल च्या प्रतिबंधित क्षेत्रातील कुटूंबांची आरोग्य तपासणी जारी


अकोला,दि.१० (जिमाका)-अकोला शहरातील बैदपूरा ,अकोट फैल या भागात संसर्गित रुग्ण आढळल्याने तेथील तीन किमी  परिघाचा भाग  पुर्णतः सील करुन प्रतिबंधित करण्यात आला आहे. या भागात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन करावयाची तपासणी आजही सुरुच होती.
त्यात बैदपूरा भागात  ३०५४ कुटुंबांमधील १५ हजार २७० व्यक्तींची तपासणी करावयाची आहे. त्यापैकी आज अखेर २५२८ कुटूंबांमधील  १२ हजार २४० जणांची तपासणी पूर्ण झाली आहे. तर आता ५२६ कुटूंबांमधील ३०३० व्यक्तिंची तपासणी बाकी आहे.
अकोट फैल भागात  ५४०० कुटुंबांमधील  २७ हजार ४२५ सदस्यांची तपासणी करावयाची आहे. त्यापैकी  ४२८८ कुटुंबांमधील २१ हजार ७८६ जणांची तपासणी पूर्ण झाली असून १११२ कुटुंबांमधील  ५६३९ जणांची तपासणी अद्याप बाकी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ