पातुर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी घरपोच इंधनसेवा


अकोला,दि.२३(जिमाका)- कोरोना प्रादुर्भावाच्या मुकाबल्यासाठी प्रशासन व विविध संस्था अनेक उपाययोजना राबवित आहे. पातूर तालुक्यात  शेतकऱ्यांसाठी  भारत पेट्रोलियमच्या वाहनाद्वारे मोबाईल पेट्रोल- डिजेल ब्राऊजर बसवून त्याद्वारे शेतकऱ्यांना थेट शेताच्या बांधावर  इंधन पुरविण्याची सेवा देण्यात येणार आहे. या सेवेचा आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
 पातूर येथील भारत पेट्रोलियम या संस्थेच्या  दुग्गल पेट्रोलियम या वितरकाने या सेवेची रुजूवात केली आहे. यासाठी एक सहा हजार लिटर्सचा टॅंकर असून त्यावर इंधन वितरक पंप बसविण्यात आला आहे. त्यावर देण्यात आलेले इंधन, त्याचे दर, एकूण रुपये या सर्व बाबी डिजीटली दर्शविल्या जातात. शिवाय  दर सारखेच. जे पेट्रोल पंपावर  दर असतील तेच दर इथंही  असतील. हा टॅंकर शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्यांना इंधन दिले जाणार आहे.
जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले की, ही सेवा अत्यंत चांगली आहे. एक तर कोरोना संसर्गाच्या काळात इंधनासाठी पंपावर गर्दी होणार नाही. शेतकऱ्याला शेतावरुन पंपावर जाण्यासाठी वेळ वाया जातो तो बचत होईल, शिवाय यामुळे इंधन साठवून ठेवण्याची प्रवृत्ती वाढते त्यातून अपघातही होऊ शकतात ते ही कमी होतील.
यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे, दुग्गल पेट्रोलियमचे पंजाबराव मोडक आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ