विविध परवानग्यांसाठी नियुक्त सक्षम अधिकारी


अकोला,दि.२३(जिमाका)- लॉक डाऊन कालावधीत शिथील केलेल्या बाबींसाठी आवश्यक परवानग्यांसाठी  सक्षम प्राधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केली आहे.
विविध प्रकारच्या परवानग्या व त्यासाठीचे सक्षम प्राधिकारी याप्रमाणे-
१.      बाहेरगावाहुन येणे व जाणे- जिल्हा पोलीस अधिक्षक
२.      मनपा क्षेत्रातील दुकाने सुरु करणे- मनपा आयुक्त.
३.       कृषि विषयक  सर्व प्रकारच्या परवानग्या (एमआयडीसी क्षेत्र वगळून)- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी.
४.     मनपा क्षेत्राव्यतिरिक्त परवानगी, रस्ते बांधकाम, पाणी पुरवठा, टंचाईची कामे,  बिगर सहकारी संस्था यांना भोजन, धान्य वितरणाची परवानगी, रेल्वे विभागाची कामे- संबंधित उपविभागीय अधिकारी
५.      मगांग्रारोहयो ची कामे- संबंधित तहसिलदार.
६.       सहकारी संस्था, बाजार समिती व अन्य परवानग्या- जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था.
७.     औद्योगिक प्रतिष्ठाने  व अन्य परवानगी- महा व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र.
८.      पशुसंवर्धन, पशू व्यवसाय,  पशू खाद्य, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ विकणे- सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अधिकारी.
९.       जंगल, वने संबंधित उपक्रम- उपसंचालक सामाजिक वनीकरण.
१०.   मत्स्य व्यवसाय, दुकाने, संकलन, वाहतूक, विक्रीइ. बाबत- उपायुक्त मत्स्य व्यवसाय, मत्स्य विकास अधिकारी.
११.   जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक (किराणा, औषधी इ.)- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ