‘कोरोनाविरुद्धचे युद्ध हे जिंकू या!’ निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा गाण्यातून प्रबोधनाचा उपक्रम


अकोला,दि.२२ (जिमाका)- कोरोनासंदर्भात जनजागृती व्हावी या हेतूने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी ‘कोरोना विरुद्धचे युद्ध हे जिंकू या!’ हे गीत तयार केले असून या गिताच्या व्हिडीओचे आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या उपस्थितीत सादरीकरण करण्यात आले.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,  पोलीस अधिक्षक अमोघ गावकर,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार,  मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण,  उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार,  जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  मोहन वाघ व अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.  
गीताचे गीतलेखन  मुकूंद नितोणे यांनी केले असून व्हिडीओ संकलन  विश्वास साठे यांनी केले आहे. गायन स्वतः संजय खडसे यांनी  केले आहे. या गीताच्या माध्यमातून कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी  नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ