रॅलीज इंडियातर्फे शासकीय रुग्णालयांना सॅनिटायझरचे मोफत वितरण


अकोला,दि.९ (जिमाका)- येथील रॅलीज इंडिया लिमिटेड कंपनी ने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये व कार्यालयांना हॅण्ड सॅनिटायझरचे  मोफत वितरण करण्यात येणार आहे. या सेवाभावी उपक्रमाचा आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याहस्ते पहिला साठा आरोग्य यंत्रणेकडे सूपूर्द करुन करण्यात आला.
सामाजिक भावना म्हणून वाणिज्यिक सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत सर्व सरकारी दवाखाने आणि सरकारी कार्यालये याना मोफत पुरवठा करण्याचे रॅली इंडियाने ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचा हस्ते पहिला साठा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांना देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार यांचीही उपस्थिती होती.रॅलीज हि टाटा ग्रुप कंपनी असून वाणिज्यिक सामाजिक उत्तरदायीत्व अंतर्गत टाटा ग्रुप सोबत हा उपक्रम राबवत आहे. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, रॅलीज चे युनिट हेड जतिंदर दुबे व एच आर मॅनेजर राजेश राजंदेकर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभाच्या तरतुदीमुळे नियमित फेड करणाऱ्यांना दिलासा