अत्यावश्यक सेवांसाठी चार पेट्रोल पंपांची वेळ वाढविली


अकोला,दि.१० (जिमाका)- जिल्ह्यात लॉक डाऊन कालावधीत   सर्व ठिकाणचे पेट्रोल पंप हे सकाळी सहा ते दुपारी १२ या वेळेत सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असून शहरातील चार पेट्रोलअपंप हे अत्यावश्यक सेवांसाठी सकाळी सहा ते सायंकाळी सहा यावेळात सुरु राहतील असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी संजय खडसे यांनी दिले आहेत.
बदल केलेल्या आदेशानुसार  अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी लागणाऱ्या इंधनासाठी  शहरातील
१)मे. वजीफदार ॲण्ड सन्स, वसंत देसाई स्टेडियम जवळ, अकोला
२) मे. एम.आर. वजीफदार ॲण्ड कंपनी, आळशी प्लॉट, अकोला
३) मे किबोको ॲटो सेंटर, शिवाजी महाविद्यालयासमोर, अकोला
४)  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ , अकोला
हे चार पेट्रोल पंप सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहतील.
बाहेर राज्यातील व राज्यांतर्गत  अत्यावश्यक सेवेचा पुरवठा सुरळीतपणे  सुरु ठेवण्याकरीता  राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोलपंप  सुरु ठेवणे अत्यावश्यक असल्याने  त्यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे आदेशात नमूद चार पेट्रोलपंप चालकांनी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना इंधन उपलब्ध करुन द्यावे. या संदर्भात उपविभागीय स्तरावर  उपविभागीय दंडाधिकारी यांनी आपल्यास्तरावर स्वतंत्र आदेश द्यावे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ