सेवायोजन कार्डाचे आधार संलग्न करण्याचे आवाहन
अकोला,दि.२८(जिमाका)-जिल्ह्यातील सर्व
सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी आपले आधार कार्ड आपल्या सेवायोजन कार्डाशी (एम्लॉयमेंट
कार्ड) कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाने विकसीत
केलेल्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आपल्या लॉगइन आयडी मधून लिंक करुन घ्यावे, असे आवाहन सहायक
आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास , रोजगार
व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले
आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्हा कौशल्य विकास
, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , अकोला या
कार्यालयात ज्या उमेदवारांनी नोकरी संदर्भात नोंदणी केली आहे मात्र आधारकार्ड
क्रमांक सेवायोजन कार्डाशी लिंक केला नसेल अशा उमेदवारांनी आपला आधार कार्ड
क्रमांक सेवायोजन कार्डाशी लिंक करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील
रोजगार (EMPLOYMENT) हा पर्याय निवडून आपल्या युजर आयडी आणि
पासवर्ड चा वापरुन लॉगीन करावे
व आपला आधार कार्ड सेवायोजन
कार्डाशी लिंक करावे. याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय
इमारत, दुसरा माळा, जिल्हाधिकारी
कार्यालय परीसर, अकोला या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे
आवाहन सहायक आयुक्त सु.रा.झळके यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा