थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश


अकोला,दि.१५(जिमाका)- कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या संचार बंदी व साथरोग प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन कडक करण्यासाठी आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणारे व सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब न करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी संजय खडसे यांनी दिले आहेत. या आदेशानुसार, थुंकणाऱ्यास ३०० रुपये,  मास्क न वापरणे २०० रुपये,  जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांजवळ सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणारे दुकानदार व ग्राहक यांना २०० रुपये प्रति ग्राहक व दुकानदारास दोन हजार रुपये दंड ठोठावण्याची कारवाई करावी. ही कारवाई स्थानिक स्वराज्य संस्था आपापल्या क्षेत्रात करतील, असेही आदेशात म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम