दिव्यांग व्यक्तिंना धान्य पोहोचवावे-जिल्हाधिकारी पापळकर


अकोला,दि.२७(जिमाका)- ज्या कुटूंबात दिव्यांग व्यक्ती आहे त्या कुटूंबाला प्राधान्याने धान्य पोहोचविण्याची व्यवस्था करावी. सध्या रमजान महिना सुरु असल्याने खजूर व अन्य फळे आदींचा पुरवठा योग्य प्रमाणात व्हावा, लोकांना दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तुंची नियमित उपलब्धता होणे महत्वाचे  आहे तसेच उद्योग पूर्ववत सुरु करण्यात येत असलेल्या अडचणींचीही दखल घेऊन त्या दूर करा ,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  आजच्या आढावा बैठकीत दिले.
 आज जिल्ह्यातील सद्यस्थिती जाणून घेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आढावा घेतला.  यावेळी अपर जिल्हाधिकारी  नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले,जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एन. काळे, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी भूसंपादन शेलार, उपजिल्हाधिकारी महसूल सुरंजे, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन खंडागळे आदी उपस्थित होते.
 यावेळी जिल्ह्यातील  लॉक डाऊन कालावधीतील रेशन धान्य वितरण,  केशरी कार्डधारकांना तसेच ज्या कुटूंबात दिव्यांग व्यक्ती आहे त्या कुटूंबाला धान्य देण्याची व्यवस्था करावी. सध्या रमजान महिना सुरु असल्याने खजूर व अन्य फळे आदींचा पुरवठा योग्य प्रमाणात व्हावा, असे निर्देश त्यांनी दिले.  जिल्ह्यात ठराविक उद्योग सुरु करण्यास मुभा देण्यात आली आहे परंतू तो उद्योग सुरु करण्यास अन्य संलग्न बाबींची उपलब्धता नसल्याने  काही ठिकाणी हे उद्योग सुरु होऊ शकलेले नाहीत. तरी  याबाबत प्रत्यक्ष उद्योजकांना येणाऱ्या अडचणी विचारुन  त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे. जिल्ह्यात रोजगार हमी योजना व अन्य योजनांची व सार्वजनिक कामे सुरु करण्याबाबतही अडचणी  दूर कराव्या असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.
यावेळी त्यांनी बाहेरगावच्या अधिकाऱ्यांशी सोशल मिडीयाद्वारे संवाद साधून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ