सामाजिक अंतराचे भान राखत जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रतिमापूजन



घरात राहून करा कोरोनाचा मुकाबला- खडसे
अकोला,दि.१४ (जिमाका)- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे प्रतिमापूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमिताने भीमगीताच्या माध्यमातून  लोकांनी घरात राहूनच कोरोनाचा मुकाबला करावा अशी साद निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी घातली.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमिवर सामाजिक अंतर राखत येथील लोकशाही सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी नायब तहसीलदार अजय तेलगोटे, कैलास गणेशपुरे, अविनाश डांगे, व निलेश दामोदर जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. साऱ्यांनी सामाजिक अंतर राखून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ