२७ जणांचे पीकेव्हीतील वार्डात स्थलांतर


अकोला,दि.११ (जिमाका)- कोरोना विषाणू संदर्भात चाचणी अंती निगेटिव्ह अहवाल आलेले परंतू वैद्यकीय निरीक्षणात व अलगीकरण करुन ठेवणे आवश्यक असलेल्या २७ जणांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन कक्षात स्थलांतरीत करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात हे लोक आतापर्यंत निरीक्षणात होते. तेथून त्यांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. ही स्थलांतराची कारवाई प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार व तहसिलदार विजय लोखंडे यांनी पार पाडली. क्वारंटाईन वार्डात या व्यक्तिंना  नाश्ता, चहा, जेवणाच्या व्यवस्थेसह  एका कक्षात एक व्यक्ती याप्रमाणे राहण्याची सोय आहे. तसेच या कक्षासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले आहे. तसेच कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ