२३९ पैकी १७९ जणांचे अहवाल प्राप्त, १६६ निगेटिव्ह


अकोला,दि.१३ (जिमाका)- जिल्ह्यात आज सायंकाळ पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार आज दिवसभरात १५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आता १६६ जणांचे अहवाल निगेटिव्ह असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह अहवाल संख्या १३ वर कायम आहे. दरम्यान या १३ जणांपैकी एका रुग्णाने  आत्महत्या केल्याने आता जिल्ह्यात १२ पॉझिटीव्ह रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल आहेत. आज दिवसभरात (गेल्या २४ तासात) १२ जण संशयित रुग्ण म्हणुन दाखल झाले. या सगळ्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत २३९ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी १७९ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून १६६ निगेटिव्ह आहेत. तर १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी दिली.
आज प्राप्त झालेल्या अहवालांनुसार पातूर येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटूंबियांपैकी ३१ जणांचे नमुने पाठविले होते त्यातील उर्वरित सगळ्यांचे अहवालही  निगेटिव्ह आले आहेत, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापैकी काल १८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ