प्रतिबंधित क्षेत्रात मुक्तसंचार, वाहनांवर फिरण्यास बंदी


अकोला,दि.१२ (जिमाका)- जिल्ह्यात ज्या ज्या भागात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले त्या भागास प्रतिबंधित करुन तेथील मुक्त संचारास बंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. या भागात (बैदपूरा, अकोट फैल आणि पातुर व बाळापूर) मुक्तसंचारास बंदी करतांनाच वाहन चालविण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. या भागात कोणीही व्यक्ती वाहन चालवितांना आढळल्यास त्याचे वाहन जप्त करुन वाहनचालकाचा वाहन परवाना कायमस्वरुपी निलंबित करण्यात यावा, असे आदेश पोलिसांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
मास्क न वापरल्यास दंड
जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी जावयाचे असेल तेव्हा प्रत्येकाने आपला चेहऱ्याचे तोंड व नाक हे मास्क अथवा रुमालाने झाकणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आदेश जारी केले आहेत. त्यानुसार मास्क अथवा रुमालाने नाक व तोंड न झाकलेल्या व्यक्तीस एक रकमी दंड करण्याची कारवाई करावी असे आदेशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ