शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी आस्थापनांना मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक

अकोला,दि.१३ (जिमाका)- केंद्र व राज्य शासन , अंगीकृत उद्यो, व्यवसाय , महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालीका , नगरपालीका , तसेच खाजगी
क्षेत्रातील आस्थापनांना मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक असून ‘महास्वंयम या वेबसाईटवर ही माहिती भरता येईल, असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सु.रा.झळके यांनी कळविले आहे.
या संदर्भात दिलेल्या माहित पत्रकात म्हटले आहे की, सर्व सरकारी तसेच खाजगी आस्थापना , उदयोग , व्यापार , व्यवसाय , कारखाने २५ किंवा त्यापेक्षा अधिक लोक काम करतात त्यांना सेवायोजन कार्यालये यांनी रिक्तपदे अधिसुचीत करण्याची सक्ती करणारा कायदा १९५९ व त्या अंतर्गत नियमावली १९६० नुसार नियोक्त्यांना त्यांचे लॉगइन मधून हे विवरणपत्र https://rojgar.mahaswayam.gov.in यावेबपोर्टलवर ऑनलाईन तिमाही विवरण (ईआर-१) पत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या वेबसाइटच्या एम्प्लॉयर (लिस्ट अ जॉब) वर क्लिक करुन एम्प्लॉयर लॉगइनवर युजर आयडी व पासवर्डने आपले लॉगइनमधून ईआर रिपोर्ट मध्ये ई-आर-१ या ऑप्शन वर क्लिक करुन तिमाही विवरणपत्र ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.तांत्रिक अडचण आल्यास akolaroigar@gmail.com या ईमेल वर संपर्क करावा. दि.३१ मार्च २०२० या तिमाही अखेर वेतनपटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाची माहितीचे विवरण ई-आर-१ या विवरणपत्रात ३० एप्रिल २०२० पर्यत महास्वंयम वेबसाईटवर ऑनलाईन सादर करणे अनिवार्य आहे,असे आवाहन सहायक आयुक्त , जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सु.रा.झळके यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा