महाराष्ट्र दिनानिमित्त आज(दि.१ मे) जिल्हाधिकारी कार्यालयातच ध्वजारोहण


अकोला,दि.३० (जिमाका)- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन  शुक्रवार दि. १ मे रोजी होणार आहे. यंदा कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी  महाराष्ट्र दिन सोहळा  अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.  त्यानुसार हा सोहळा  केवळ जिल्हाधिकारी कार्यालय , अकोला येथे शुक्रवार दि. १ मे रोजी सकाळी आठ वाजता राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास  केवळ पालकमंत्री,  जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद  यांनीच उपस्थित रहावे असे  निर्देश दिले असून जिल्ह्यातील सर्व विभागांचे मुख्यालय, उप विभागीय कार्यालय, तहसिल कार्यालय  येथे कोठेही कार्यक्रम आयोजित करु नये,  मुख्यालयात आयोजित कार्यक्रमासही  अन्य अधिकारी- कर्मचारी यांनी उपस्थित राहू नये. जिल्हाधिकारी कार्यालय वगळता जिल्ह्यात अन्यत्र कोठेही  ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करु नये असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ