कापूस खरेदी केंद्र बुधवारपासून (दि.२२) सुरु- जिल्हा उपनिबंधकांचे निर्देश; गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधी नोंदणी करण्याचे आवाहन

अकोला,दि.१८ (जिमाका)- जिल्ह्यातील मुर्तिजापूर वगळता सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांतर्गत कापूस खरेदी केंद्र बुधवार दि. २२ पासून सुरु करण्यात यावेत असे निर्देश जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांनी  सर्व बाजार समित्यांना दिले असून त्यासंदर्भात पणन  संचालनालयाकडून आलेल्या मानक कार्यपद्धती व अटी शर्तीही पाठवल्या आहेत. त्या पद्धतीचे पालन करुन आधी मोबाईल वा फोन वरुन मालाची नोंदणी करुन नंतर शेतकऱ्यांना केवळ प्रत्यक्ष कापूस खरेदीच्या दिवशीच बाजार समितीत बोलवावे, असे निर्देश देण्यात आले आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमिवर ही मानक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे.
या संदर्भात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्व सातही कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे खरेदी-विक्रीचे कामकाज सुरळीतपणे सुरु आहे. परंतु लॉकडाउन घोषित केल्यापासून जिल्ह्यातील सर्व प्रकारचे कापूस खरेदी केंद्र बंद आहेत. शासनाने कोरोना विषाणुचा (COVID-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १४ मार्च पासुन लागू करून खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केली आहे.दि. २० पर्यंत CCI ची कापूस खरेदी केंद्र सुरू होणे शक्य नसल्याने जिल्ह्यातील बाजार समिती अंतर्गत येणारे परवानधारक खाजगी व्यापारी यांना कोरोना विषाणुचा (COVID-19) प्रादुर्भाव लक्षात घेता, शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश व कोरोना विषाणुचा (COVID-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पणन संचालक, पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकातील सुचनांनुसार तयार करण्यात आलेल्या मानक कार्यपद्धतीचे पालन बाजार समित्यांनी दक्षता घेण्याच्या अटी व शर्तीस अधीन राहुन जिल्ह्यातील मुर्तिजापूर व्यतिरीक्त सर्व कापुस खरेदी केंद्र संबंधीत कृषि उत्पन्न बाजार समिती परीसरात सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अटी व शर्ती याप्रमाणे :-
१.ही कापूस खरेदी ही फक्त अकोला जिल्ह्यातील CCI कडे नोंदणी झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडील  कापूस खरेदीसाठीच आहे. (शेतकऱ्यांकडून रहिवासी पुरावा घेणे.)
२. शनिवार दि.१८ ते मंगळवार दि. २१रोजी शेतकऱ्यांनी कापूस विक्री संदर्भात बाजारसमितीनिहाय संपर्क क्रमांकावर नोंदणी करावी.
३. शेतकऱ्यांची नोंदणी करतांना नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक व विक्रीस आणावयाचा कापूस किती? याची नोंद घेण्याची दक्षता घ्यावी.
४. शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, बॅंक पासबुक , आधारकार्ड सोबत आणावे.
.कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत संबंधित बाजार समिती व खरेदीधारकांकडून प्रसिद्धी देण्यात यावी.
६. शेतकऱ्यांनी कार्यालयीन वेळेत   शनिवार दि.१८ ते मंगळवार दि. २१ पर्यंत खाली दिलेल्या  मोबाईल क्रमांकावर  संपर्क साधून आपला टोकन क्रमांक प्राप्त करुन घ्यावा.  त्यासाठी शेतकऱ्यांनी फोनवरुनच  नोंदणी करावी. प्रत्यक्ष बाजार समितीत वा खरेदी केंद्रावर जाण्याची गरज नाही.
नोंदणी करण्यासाठीचे नावे व क्रमांक याप्रमाणे-
अकोला कृउबा. सुरेश कराळे- ९८२२२०८१५६
बार्शीटाकळी- शंकर बाडे- ९३०९७९४८८२ व संदीप सरप-९०११०२७६९४
पातूर- किरण तायडे-९५५२९८१७१५
हिवरखेड अंतर्गत  तेल्हारा- सु.सो. नात्रे-९८८१९४१०४२ व ब. श्री. पाथ्रीकर-९७६४६२१६१४
बाळापूर- विनोद पुरुषोत्तम भाजीपाले-७६२०९९७९४६
कृषि उत्पन्न बाजार समिती, अकोट या केंद्रावर या अगोदर नोंदणी झालेल्या सुमारे २७०० शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी झाल्यावर पुढील नोंदणी सुरू करण्यात यावी.
. CCI हे Non FAQ दर्जाचा कापुस खरेदी करत नसल्यास शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्याकडे अशा सुचना बाजार समितीने शेतकऱ्यांना द्याव्या व FAQ दर्जाचा मालच CCI व कॉटन फेडरेशनकडे विक्रीकरिता न्यावा.
. शासकीय खरेदीमध्ये FAQ दर्जाचा कापूस असल्यावरच CCI कापुस खरेदी करेल.
. Non FAQ दर्जाचा माल असल्यास खाजगी व्यापारी कापसाची प्रत पाहुन भव ठरवेल व तो शेतकऱ्यास मान्य असल्यास व्यवहार करावा.
१०.बाजार समितीमध्ये / जिनिंग प्रेसिंग मध्ये आवश्यक असलेल्या सर्व कर्मचारी / कामगार यांना सहायक निबंधक व बाजार समिती सचिवाचे संयुक्त स्वाक्षरीने पासेस उपलब्ध करून द्याव्यात व रजिस्टर मध्ये त्याची नोंद करावी. (कर्मचारी, हमाल मापारी, अडते, व्यापारी, कामगार) पासेसचा दुरूपयोग कोणीही करणार नाही याची खबरदारी घ्यावी.
११. बुधवार दि. २२ पासुन सकाळी नऊ ते दुपारी दोन या कालावधीतच दररोज प्रत्यक्ष कापूस खरेदी करण्यात येईल.
१२. दि.१८ ते २१ दरम्यान नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे कापूस खरेदी झाल्याशिवाय पुढील कापूस खरेदी करण्यात येवु नये.
१३. बाजार समितीने दि.१८ ते २१ दरम्यान नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नावांना प्रसिद्धी द्यावी.
१४.प्रत्येक जिनिंग फॅक्टरी खरेदी केंद्रावर उपलब्ध संसाधने, सोशल डिस्टंसींग व कोरोना विषणु प्रतिबंधात्मक उपाय योजना यांच्या अनुषंगाने दररोज कापूस खरेदीसाठी बोलवावयाच्या शेतकऱ्यांची संख्या ठरवावी. ज्या शेतकऱ्यांची आधी नोंदणी झाली आहे त्या शेतकऱ्यांचा कापुस प्रथम प्राधान्याने खरेदी करावा. खरेदी केंद्रावर  नोंदणी केलेल्या  शेतकऱ्यांना लघुसंदेश (SMS) व दूरध्वनीद्वारे कळविण्याची खबरदारी घ्यावी. त्यात वार, दिनांक, वेळ नमूद करावे.
या अटीशर्तींचे पालन करण्याची जबाबदारी ही  संबंधित बाजार समितीची राहिल. तसेच शेतकऱ्यांना वेळेत  लघुसंदेश (SMS) पोहोचतील याची व्यवस्थाही बाजार समितीने करावी.
१५. अकोला, बार्शी टाकळी, बाळापूर, पातूर. अकोट, तेल्हारा येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी  आपापल्या कार्यक्षेत्रानुसार बाजारसमितीला भेट देऊन  नोंदणी ते विक्री पर्यंतच्या कामकाजाचा अहवाल दररोज द्यावा.  तसेच दि.१३ ते १७ एप्रिल या कालावधीत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नावांची यादी प्रसिद्ध करावी तसेच अटीशर्ती व मानक कार्यपद्धतीचे बाजार समित्यांकडून पालन होत असल्याबाबत पाहणी वेळोवेळी करावी, असे निर्देश जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ