उद्योगाची चाके गतिमान; १२२ कारखाने सुरु करण्यास परवानगी


अकोला,दि.२१(जिमाका)- संचारबंदीतील मर्यादीत शिथीलीकरणानंतर घालून दिलेल्या अटीशर्तींच्या अधिन राहून जिल्ह्यात १२२ कारखाने (उद्योग एकके) सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या आधी परवानगी असलेले अन्न प्रक्रिया व कृषि आधारीत ३२८ उद्योग सुरु होते.
जिल्ह्यात संचारबंदी शिथील केल्यानंतर औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरु करण्याबाबतचे निर्बंध शिथील करण्यात आले होते. त्यानुसार उद्योजकांनी जिल्हाप्रशासनाकडे परवानगी साठी अर्ज दाखल केले होते. यासाठी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांचेकडून प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात  १४१ जणांची उद्योग सुरु करण्याची परवानगी मागितली होती.त्यातील १९ जणांना परवानगी नाकारण्यात आली असून   १२२ जणांना परवानगी देण्यात आली आहे. यापुर्वी जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या तसेच अन्न प्रक्रिया व कृषि उत्पादन आधारीत उद्योगांचे ३२८ उद्योग सुरुच होते. त्यात ३४१२ कामगार कार्यरत आहेत अशी माहिती देण्यात आली.  या सर्व उद्योगात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन  कामकाज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ