टास्क फोर्स समितीच्या आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा


अकोला,दि.१८ (जिमाका)- जिल्ह्यात कोरोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने  सुरु असलेला लॉक डाऊन, लॉक डाऊनचा वाढविण्यात आलेला कालावधी या पार्श्वभुमिवर जिल्ह्यातील नागरिकांचे विविध प्रश्न  सोडविण्यासाठी  विविध विषय समित्यांचा टास्क फोर्स गठित करण्यात आला असून त्यातील नियोजन , आरोग्य व अन्य संलग्नित विषयांची बैठक आज पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे हे होते. यावेळी उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले,  वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामकुमार शिरसाम, डॉ. एम.डी. राठोड आदी उपस्थित होते.
 निधी नियोजन, आरोग्य सुविधांची परिपूर्तता, विविध अहवाल तयार करणे त्यातील माहिती संबंधित वरिष्ठांना वेळेत पोहोचविणे याबाबत सुचना देण्यात आल्या. यावेळी कामकाजातील सुसूत्रता व नियोजन करुन लोकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी या समित्यांची रचना करण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ