१९१ पैकी १३९ जणांचे अहवाल प्राप्त, १२६ निगेटिव्ह; ५० प्रलंबित


अकोला,दि.११ (जिमाका)- जिल्ह्यात आज सायंकाळ पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार आज दिवसभरात १९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलयाने आता १२४ जणांचे अहवाल निगेटिव्ह असून जिल्ह्यात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या १३ वर कायम आहे. दरम्यान या १३ जणांपैकी एका रुग्णाने  आज पहाटे आत्महत्या केल्याने आता जिल्ह्यात १२ पॊझिटीव्ह रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल आहेत. आज दिवसभरात (गेल्या २४ तासात) ९ जण संशयित रुग्ण म्हणुन दाखल झाले.  या सगळ्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत १८७ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. तर आणखी तिघांचे  नमुने दुबार तपासणीसाठी पाठवले आहेत.त्यापैकी १३७ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून १२६ निगेटिव्ह आहेत. तर १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
जिल्ह्यात आजतागायत प्रवासी म्हणून ३१६ जणांची नोंद झाली आहे. त्यातील १२० जण अद्याप अलगीकरणात आहेत. (७८ जण गृह अलगीकरणात तर ४२ जण संस्थागत अलगीकरणात) तर १३८ जणांचा गृह अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे, आज अखेर १०३ व्यक्ती भरती असून त्यात ७५ हे अलगीकरणात तर २८ हे विलगीकरणात आहेत अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालय अकोला येथून प्राप्त झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ