बॅंका,वित्तीय संस्थांच्या वेळेत आजपासून बदल


अकोला,दि.२४(जिमाका)- कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन कालावधीत सद्यस्थितीत बॅंका व वित्तीय संस्थांच्या सुरु राहण्याच्या वेळेत  शनिवार दि.२५ पासून बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. आता बॅंका, मायक्रो फायनान्स, सहकारी बॅंका, पतसंस्था, गृहनिर्माण वित्त कंपन्या इ. सर्व वित्तीय संस्था ह्या शनिवार दि. २५ पासून सकाळी ९ ते दुपारी २ यावेळात सुरु राहतील. या कालावधीत येणाऱ्या ग्राहकांनी व कर्मचाऱ्यांनी  सामाजिक अंतर राखणे व स्वच्छतेच्या निकषांचे पालन करावे, असे या आदेशात म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ