निर्जंतूकीकरणासाठी औषधी व साहित्य खरेदी; परिवहन कार्यालयाने मागविली दरपत्रके


अकोला,दि.२२(जिमाका)- उपप्रादेशिक परिवहन विभागाला आपल्या अखत्यारीतील कार्यालये, वाहने व सार्वजनिक स्थळांचे निर्जंतूकीकरण करण्यासाठी साहित्य व आवश्यक निर्जंतूके,औषधे खरेदी करावयाची असल्याने त्यांनी त्यासाठी दरपत्रके मागविली आहेत.
यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  कार्यालयाच्या वतीने  प्रसिद्धीस देण्यात आलेल्या सुचनेनुसार, कोरोना विषाणू (कोविड-२९) वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यालयातील कर्मचारी, शासकीय कामासाठी कार्यालयात उपस्थित राहणारी जनता तसेच सार्वजनिक वाहतूक करणारी वाहने व सार्वजनिक स्थळे यांचे निर्जंतूकीकरण करण्यासाठी शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आहे. त्यासाठी विहीत कार्यपध्दती अवलंबून आवश्यक खरेदी करण्यास परिवहन आयुक्त कार्यालयाने कळविले आहे. त्यासाठी  उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने  हॅण्ड सॅनिटायझर २०० मिलि,  हॅण्ड सॅनिटायझर पाच लिटर, सोडीयम हाय्पोक्लोराईड १०० लिटर,  हॅण्ड वॉश,  मास्क एन ९५,  ग्रीन मास्क, पीपीई किट,  ब्ल्यू मास्क, इन्फ्रारेड थर्मोमिटर गनम शोल्डर स्प्रे मशिन १० लिटर क्षमता,  शोल्डर स्प्रे मशिन  पाच लिटर क्षमता, हॅण्ड ग्लोव्हज,  पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठीचे द्रावण या प्रमाणे खरेदी करावयाचे आहेत.
इच्छुक पुरवठादारांनी गुरुवार दि. ३० पर्यंत आपले दरपत्रके बंद लिफाफ्यात कर व भाड्यासहित सादर करावे किंवा mh30@mahatranscom.comया ईमेलवर विहीत वेळेत सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेले दरपत्रक स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. दरपत्रक पाठविण्यासाकरिता पत्ता-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालय,अकोला रिजनल वर्कशॉप जवळ खडकी बु,अकोला.४४४००४, दुरध्वनी क्रमांक ०७२४-२४१०२८८. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अकोला या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ