प्रतिबंधित क्षेत्रातील मृत्युची माहिती कळविणे बंधनकारक


अकोला,दि.(जिमाका)- कोरोना विषाणू संसर्गित भागाला प्रतिबंधित करण्यात आले आहे. अशा या भागांमध्ये कुणाचाही कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याची माहिती प्रशासनाला कळविणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले आहेत.
जिल्ह्यातील  तथा शहरातील ज्या ज्या भागात  कोरोना बाधीत रुग्ण आढळले ते ते क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले आहेत. या क्षेत्रात कोणाही व्यक्तीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्या घटनेची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही माहिती महानगरपालिका हद्दीत मनपा यंत्रणेमार्फत, नगरपालिका हद्दीत तालुका यंत्रणेमार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास कळविणे बंधनकारक आहे. माहिती न देणाऱ्यांविरुद्ध  कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही आदेशात देण्यात आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ