रेशन दुकानांसंदर्भात तक्रारनिवारणासाठी भरारी पथक गठीत


 अकोला,दि.२३(जिमाका)-   राज्‍यात कोवीड १९ च्‍या साथीमुळे निर्माण झालेल्‍या परिस्थितीचा मुकाबला करण्‍यासाठी अन्‍न्‍ नागरी पुरवठा विभागामार्फत धान्‍याचा पुरवठा करण्‍यात येत आहे. लोक खुल्‍या बाजारापेक्षा सध्‍या स्‍वस्‍तधान्‍य  दुकानामार्फत अधिक धान्‍य खरेदी करत आहेत. स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार यांच्‍या बाबत  प्राप्त तक्रारींचा  प्रभावीपणे निपटारा करण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरावर वर्ग १ अधिकारी यांच्या अध्‍यक्षतेखाली एक भरारी पथक गठीत करण्‍यात आले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. एस. काळे यांनी कळविले आहे.
जिल्‍हास्‍तरावर  नियुक्त  भरारी पथक व सदस्यांचे संपर्क क्रमांक याप्रमाणे-
अ. क्र.
अधिकारी-कर्मचारी
पदनाम
पद
भ्रमणध्‍वनी क्रमांक
1
दिनकर बोरूळकर
सहायक लेखाधिकारी
अध्‍यक्ष
9373714329
2
रविंद्र येन्‍नवार
निरीक्षण अधिकारी ,अकोला शहर
सदस्‍य
9764450052
3
अमोल पळसपगार
निरीक्षण अधिकारी ,अकोला ग्रामीण
सदस्‍य
9665708902
4
संतोष कुटे
पुरवठा निरीक्षक अकोला शहर
सदस्‍य
9850601684
5
जॉकी डोंगरे
पुरवठा निरीक्षक अकोला शहर
सदस्‍य
9527726436
6
निलेश कळसकर
पुरवठा निरीक्षक अकोला ग्रामिण
सदस्‍य
8149200910
              
           याप्रमाणे जिल्‍हा स्‍तरावरील भरारी पथक यांची नेमणुक करण्‍यात आली असून नागरिकांनी या क्रमांकांवर आपली तक्रार नोंदवावी. पथकातील सदस्यांनी तक्रारीचे निराकरण दोन दिवसांच्या आत करुन  अहवाल सादर करावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे यांनी  कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ