महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्यास मंगळवारपर्यंत मुदतवाढ

 महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 


स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्यास मंगळवारपर्यंत मुदतवाढ




अकोला, २५: राज्य शासनाच्यावतीने या वर्षीपासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्य उत्सवः म्हणून साजरा करण्यात येत आहे. या राज्य उत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५' च्या अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेस मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.

अधिकाधिक मंडळांना सहभागी होता यावे, यासाठी आता अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  दि. २६ ऑगस्ट २०२५ असेल.


या स्पर्धेचे अर्ज https://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध ऑनलाइन पोर्टलद्वारे स्वीकारले जाणार आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी सहभागी होऊन तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पारितोषिके जिंकण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन