शाश्वत शेतीदिनानिमित्त शेतक-यांना मार्गदर्शन



 

 

शाश्वत शेतीदिनानिमित्त शेतक-यांना मार्गदर्शन

अकोला, दि. ८ : भारतरत्न डॉ एम एस स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त शाश्वत शेती दिन तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन सोनाळा येथे गुरूवारी करण्यात आले.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विशाल गौड, तालुका कृषी अधिकारी विलास वाशिमकर, सरपंच महानाम फुलके, मंडळ कृषी अधिकारी विजय वानखेडे, उप कृषी अधिकारी विजय महाजन, सहाय्यक कृषी अधिकारी कु. वैशाली इंगळे  ग्रामपंचायत सदस्य व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

या कार्यक्रमांमध्ये सोयाबीन, तूर पिकावरील किड नियंत्रण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी श्री. वाशिमकर यांनी सोयाबीन पिकावरील किड नियंत्रण तसेच कृषी विभाग विविध योजनांविषयी माहिती दिली.

मंडळ कृषी अधिकारी श्री. वानखेडे यांनी डॉ. स्वामीनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय महाजन यांनी तसेच संजय करवते यांनी आभार मानले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा