नवोदय विद्यालयात कला महोत्सवाचा शुभारंभ
नवोदय विद्यालयात कला महोत्सवाचा शुभारंभ
जवाहर नवोदय विद्यालय बाभुळगाव, अकोला येथे आज रंगलेल्या कला महोत्सव कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये कलात्मकतेचा नवा उत्साह जागृत केला. या कार्यक्रमात नवोदय विद्यालय समिती,पुणे विभागातील अमरावती संकुलातील 18 नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या सांस्कृतिक आणि कलात्मक सादरीकरणांद्वारे आपली कला सादर केली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. या महोत्सवामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रा.प्रशांत गावंडे जे. आर.डी. टाटा शाळेचे संस्थापक व स्पर्धचे परीक्षक म्हणून प्रा.श्री देवेंद्र देशमुख ,प्रा.श्री शुभम नारे ,प्रा.श्रीमती रागिनी खोडवे, उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे कौतुक करताना सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळते नंतर विद्यार्थ्यांनी गायन, वादन, नृत्य, नाट्य, चित्रकला, हस्तकला इत्यादी स्पर्धांमध्ये भाग घेतला. प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवले आणि प्रेक्षकांची मने जिंकली.
सदर कार्यक्रम हा दिनांक ०६/०८/२०२५ व ०७/०८/२०२५ दोन दिवस सुरू राहील .
कार्यक्रमाचे आयोजन जवाहर नवोदय विद्यालय अकोला चे प्राचार्या श्रीमती. कविता चव्हाण, उप प्राचार्य श्री.ज्ञानेश्वर तायडे सर, व कला विभाग प्रमुख श्री.राजेश सोनटक्के सर आणि संगीत विभाग प्रमुख श्री. नेवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले व सूत्र संचालन श्री. अशोक पाटील सर व श्रीमती शैलेजा पाध्ये मॅडम यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा