‘प्लेसमेंट ड्राईव्ह’मध्ये १०० पदे भरणार

 ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’मध्ये १०० पदे भरणार

अकोला, दि. १९ : जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी खाजगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने दि. २० ऑगस्ट रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह- पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात ४ नामांकित खासगी कंपन्यांमार्फत एकूण १०० रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर उमेदवारांना संधी उपलब्ध आहेत. या मेळाव्याकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रीया
 https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या वेबपोर्टलच्या माध्यमातून करावा व दि. २० ऑगस्ट रोजी मुलाखतीसाठी रोजगार मेळाव्यास प्रत्यक्ष उपस्थित राहावे. या रोजगार मेळाव्यास ऑनलाईन सहभाग नोंदवावा.

जास्तीत जास्त नोकरी इच्छूक उमेदवारांनी आपले बायोडेटा, शैक्षणिक कागदपत्रे, तसेच पारपत्र आकारातील छायाचित्रे व इतर आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, अकोला येथे स्वखर्चाने उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दू. क्र. ०७२४ - २४३३८४९ किंवा ७०२४२४१०९८ / ९४२१४२५०६६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.
0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा