कामगार विभागाच्या कार्यालयांमध्ये १७ सप्टेंबरला भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी करा - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश


मुंबई, दि. 1  —  राज्यातील कामगार विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये भगवान विश्वकर्मा यांची जयंती दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरी करण्यात यावी, असे निर्देश कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी आज दिले.

यानुसार, कामगार विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये भगवान विश्वकर्मा यांची प्रतिमा लावण्यात येणार असून त्या प्रतिमेचे पूजन करून जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे. मात्र, जर १७ सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी असेल, तर जयंती पुढील कार्यदिवशी साजरी करण्यात यावी, असेही निर्देश मंत्री ॲड.फुंडकर यांनी दिले.
000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा