राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचा अकोला जिल्हा दौरा
अकोला, दि. 13 : राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर हे दि. 14 ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
गुरूवार, दि. 14 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता अकोला शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. शुक्रवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.50 वाजता शासकीय विश्रामगृह येथून शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 8.55 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व राखीव. सकाळी 9.05 वाजता भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभास उपस्थिती. सकाळी 10.30 वाजता कृषी विभाग व प्रकल्प संचालक, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कार्यालय, अकोला आयोजित ‘रानभाजी महोत्सव’ उद्घाटन समारंभास उपस्थिती. सोईनुसार अकोला येथून शासकीय वाहनाने खामगांव, जि. बुलढाणाकडे प्रयाण.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा