नियोजनभवनात महसूलदिन साजरा; महसूल सप्ताहाचा शुभारंभ जलद सेवेची कार्यपद्धती कायमस्वरूपी अंगीकारावी - जिल्हाधिकारी अजित कुंभार
















 

 

नियोजनभवनात महसूलदिन साजरा;

महसूल सप्ताहाचा शुभारंभ

जलद सेवेची कार्यपद्धती कायमस्वरूपी अंगीकारावी

-        जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. १ : महसूल सप्ताहानिमित्त राबविण्यात येणारी जलद सेवा, शिबिर, उपक्रमांची मोहिम केवळ या सप्ताहापुरती मर्यादित न ठेवता लोकोपयोगी कामकाज व तत्काळ सेवेची कार्यपद्धती कायमस्वरूपी निर्माण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.

 

महसूलदिन, तसेच महसूल सप्ताहाच्या शुभारंभानिमित्त कार्यक्रम जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत नियोजनभवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, महापालिका आयुक्त सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी  विजय पाटील, उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर, जोगेंद्र कट्यारे, निखिल खेमनार, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, संदीपकुमार अपार, जिल्हा भूमी अभिलेख अधिक्षक भारती खंडेलवाल, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, तहसीलदार गौरी धायगुडे, अधिक्षक श्याम धनमने, जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र येन्नावार आदी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, विविध काळातील प्रशासनिक बदल स्वीकारत महसूल विभागाने मोठी वाटचाल केली आहे. सातबारा संगणकीकरण, ई-चावडी, ॲग्रीस्टेक अशा नवनव्या जबाबदा-या, आपत्तीच्या, तातडीच्या प्रसंगी जलद सेवेची जबाबदारी विभागाकडून समर्थपणे पार पाडण्यात येत आहे. महसूल सप्ताहानिमित्त जिल्हाभरात विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. पारदर्शक प्रशासनाचे आपले उत्तरदायित्व ओळखून जलद, कार्यक्षम, तत्पर सेवेचा आदर्श कायमस्वरूपी निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेश्राम, पोलीस अधिक्षक श्री. चांडक, आयुक्त श्री. लहाने यांनीही मनोगत व्यक्त केले.

गत वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, अकोल्याचे तहसीलदार सुरेश कव्हळे, नायब तहसीलदार डॉ. सागर भागवत, नितीन लोणकर, नीलेश सांगळे, मंडळ अधिकारी देवेंद्र खडके, ग्राम महसूल अधिकारी संगीता दराडे, महसूल सहायक अरूणा जोशी, वाहनचालक अमोल पवार, गजानन खोले, प्रतिज्ञा कावरे, पोलीस पाटील संजय गोमासे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे, दत्तू जुमडे, नीलेश शेंडे, उज्ज्वला कातखेडे, प्रमोद रंगारी, अनिल घ्यारे, स्वप्नील पागृत, संजय भालेराव, सुनीता शिंदे यांचा गौरव करण्यात आला.

सेवानिवृत्त अधिकारी डी. टी. पंधरे, कल्पना वानखडे,दीपक सोळंके, दत्तात्रय टोहरे, शंकर मरसकोल्हे आदींनाही गौरविण्यात आले. ई- शिधापत्रिका, वय व अधिवास प्रमाणपत्र, श्रावण बाळ योजना आदी विविध प्रमाणपत्रांचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी प्रास्ताविक केले. अधिक्षक श्री. धनमने यांनी सूत्रसंचालन केले.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा