"हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र" अंतर्गत अनभोरा येथे वृक्ष लागवड


 

 "हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र" अंतर्गत अनभोरा येथे  वृक्ष लागवड  

अकोला, दि. 11 :  राज्य शासनाच्या "हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र"  या महत्वाकांक्षी अभियानात जिल्हा जलसंधारण कार्यालयातर्फे मूर्तिजापूर तालुक्यात मौजे अनभोरा येथे रविवारी वृक्ष लागवड मोहिम घेण्यात आली.

या उपक्रमाचा शुभारंभ आमदार हरिष पिंपळे यांच्या हस्ते झाला. महसुल व वन विभागाच्या दि. ११ जून २०२५ च्या शासन निर्णयानुसार राज्यभर १० कोटी वृक्ष लागवड मोहिम राबविण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यासाठी ८८५० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

या मोहिमेचा मुख्य हेतू पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे रक्षण आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भक्कम हिरवळ निर्माण करणे असल्याचे आमदार श्री. पिंपळे यांनी सांगितले. मोहिमेच्या यशासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणी, क्षेत्रनिहाय उद्दिष्टे आणि वृक्ष लागवड-संगोपनाची काटेकोर व्यवस्था आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

मौजे अनभोरा येथे विविध प्रजातींची १०० रोपे लावण्यात आली असून, त्यांची नोंद "अमृतवृक्ष" अॅपवर करण्यात आली आहे. या कार्यक्रमास जिल्हा जलसंधारण अधिकारी  अमोल मस्कर, जलसंधारण अधिकारी मंगेश काळे, संजय कुंभरे, अर्जुन गाऊत्रे, बाळकृष्ण क्षीरसागर, वरिष्ठ लिपिक अमोल देशमुख, पाणलोट विकास पथक, पाणलोट समिती अध्यक्ष व सचिव, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा