तंबाखू जाहिरात प्रतिबंध व व्यापार, उत्पादन विनिमय कायद्याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन
तंबाखू जाहिरात प्रतिबंध व व्यापार, उत्पादन
विनिमय कायद्याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन
अकोला, दि. २२ : आरोग्य विभागातर्फे नियोजनभवनात आज आयोजित कार्यशाळेत तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम
व तंबाखू उत्पादने जाहिरात प्रतिबंध, व्यापार उत्पादन, पुरवठा व वितरण कायद्याविषयी
मार्गदर्शन करण्यात आले.
विविध कार्यालयांच्या अधिकारी व कर्मचा-यांसाठी जिल्हा शल्यचिकित्सक
कार्यालयातर्फे ही कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सऊद देशमुख, शिक्षणाधिकारी
रतनसिंग पवार आदी उपस्थित होते.
कर्करोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद सोर यांनी तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम
व त्यापासून सुटकेसाठी जीवनशैलीत आवश्यक बदल याविषयी शास्त्रीय माहिती दिली. मराठवाडा
ग्रामीण विकास संस्थेच्या डॉ. निकिता गायकवाड यांनी तंबाखूमुक्त कार्यालय या संकल्पनेबाबत
सविस्तर माहिती दिली. डॉ. प्रीती कोगदे यांनी कायद्याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. शीतल म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. धम्मसेन शिरसाठ यांनी आभार
मानले. जानराव अवघड, सय्यद आरिफ, रीना चोंडकर, विजय वानखडे, अविनाश शिनगिरे यांनी परिश्रम
घेतले. विविध यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा