अन्न व औषध प्रशासनाचे पत्रक

नाश्त्यात पाल; ‘एफडीए’कडून कारवाई

अन्न व औषध प्रशासनाचे पत्रक

अकोला, दि. ११ : जिल्हा रूग्णालयात दाखल एका रूग्णास त्यांच्या नातेवाईकाने रूग्णालयाबाहेरील उपाहारगृहातून पोहे आणून दिले. त्यात पालीचे मुंडके आढळले. त्याबाबत वृत्तही दि. ९ ऑगस्टला काही माध्यमांत प्रसिद्ध झाले. यावरून अन्न व औषध प्रशासनातर्फे तपास करण्यात आला. रुग्णाने आपल्याला विषबाधा झाली नाही व कोणाबाबत तक्रार नाही, असा जबाब दिला, तसेच हे पोहे कोणत्या उपाहारगृहातून आणले हे खात्रीशीर सांगता येत नाही, असे नमूद केले. 

तथापि, अन्न व औषध प्रशासनाने रुग्णालयाच्या परिसरातील उपाहारगृहांची सखोल तपासणी केली. त्यात अस्वच्छता व त्रुटी आढळल्याने अग्रवाल स्वीट व रसवंती सेंटर या उपाहारगृहाची नोंदणी पुढील आदेशापर्यंत निलंबित केली आहे. त्याचप्रमाणे, गुप्ता ज्युस सेंटर, अग्रवाल डेअरी व डेली नीड्स, अग्रवाल स्वीट मार्ट या अन्न आस्थापना व उपाहारगृहांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यांच्या स्पष्टीकरणानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सहायक आयुक्त दे. गो. वीर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

०००

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा