‘नाफेड’च्या खरेदी प्रक्रियेत ई-पीक पाहणी आवश्यक
‘नाफेड’च्या खरेदी प्रक्रियेत
ई-पीक पाहणी आवश्यक
अकोला, दि. २८ : केंद्र शासनाने
चालू हंगामासाठी निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्य सहकारी पणन महासंघ व एनसीसीएफतर्फे
मूग, उडीद, सोयाबीन, तूर आदी कडधान्य व तेलबियांची खरेदी करण्यात येईल. या प्रक्रियेसाठी
शेतक-यांकडे ई-पीक पाहणी असलेला सातबारा उतारा आवश्यक आहे, असे जिल्हा पणन अधिकारी
एम. जी. काकडे यांनी सांगितले.
संपूर्ण खरेदी प्रक्रिया पारदर्शक,
कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्यात येईल. केंद्र शासनाच्या आधारभूत
किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांची ई-पाहणी शासनाने
दिलेल्या कालावधीत पूर्ण करावी, असे आवाहन श्री. काकडे यांनी केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा