उत्तराखंड दुर्घटनेत अडकलेल्यांबाबत माहिती देण्याचे आवाहन
उत्तराखंड दुर्घटनेत अडकलेल्यांबाबत माहिती देण्याचे आवाहन
अकोला, दि. ६ : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील थराली येथे
दि. ५ ऑगस्ट रोजी भूस्खलन होऊन मोठे नुकसान झाले. अकोला जिल्ह्यातील कुणाचे नातेवाईक,
परिचित, पर्यटक या परिसरात गेले असतील तर तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा तहसील
कार्यालयात माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक (०७२४) २४२४४४४ किंवा पोलीस
नियंत्रण कक्षाला (०७२४) २४४५३३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात
आले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा