ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अकोला, दि. 21 : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सन २०२५-२६ पासून कार्यान्वित करण्यात आली असून दि. २७ ऑगस्ट २०२५ पर्यंत सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येत आहे.

इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यायसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतू इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या, आदिवासी विकास विभागाच्या, सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधीत शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसावा. अशा इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत विद्यार्थ्यांचे आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली आहे. सदर अर्ज hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येतील.

अटी व शर्ती :

विद्यार्थी वसतीगृह प्रवेशास पात्र असावा, विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला (इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग), विद्यार्थी अनाथ असल्यास महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र, विद्यार्थी दिव्यांग असल्यास जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांचे पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख पेक्षा जास्त नसावे, विद्यार्थ्यांने स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहिल, विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा, विद्यार्थी इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा, विद्यार्थ्यांना सदर योजनेसाठी अर्ज करतांना किमान ६० टक्के गुण व दिव्यांगास ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे, विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा, भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवाशी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी), स्वयंघोषनापत्र (दिलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबत), कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक २७ ऑगस्ट २०२५ असून इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आधार योजनेकरिता अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा