इमाव बहुजन कल्याण विभागातर्फे पं. दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना
इमाव बहुजन कल्याण विभागातर्फे
पं. दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना
अकोला, दि. 21 : पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयम योजनेसाठी दि. २७ ऑगस्टपूर्वी
ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त डॉ. अनिता
राठोड यांनी केले आहे.
इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यायसायिक अभ्यासक्रमामध्ये
प्रवेश घेतलेल्या, परंतू शासनाच्या किंवा संबंधीत शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये
मोफत प्रवेश मिळालेला नसावा. अशा इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष
मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता, निवास भत्ता
व निर्वाह भत्ता या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत
विद्यार्थ्यांचे आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने पंडित
दिनदयाल उपाध्याय स्वयमयोजना सुरू केली आहे.
अर्ज hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात
येतील.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा