सामूहिक शेततळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

सामूहिक शेततळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अकोला, दि. २५ : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात सामूहिक शेततळे व वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी अनुदान मिळण्यासाठी इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

सामूहित शेततळ्यांत ५ हजार घ. मी. तळ्यासाठी सर्वसाधारण क्षेत्रात ३ लक्ष व अधिसूचित क्षेत्रात ३.७५ लक्ष रू. अर्थसाह्य देय आहे. ३ हजार ५०० घ. मी. तळ्यासाठी सर्वसाधारण क्षेत्रात  २.१० लक्ष व अधिसूचित क्षेत्रात २.६२ लक्ष रू. अर्थसाह्य देय आहे.२ हजार घ.मी. तळ्यासाठी सर्वसाधारण क्षेत्रात १.२० लक्ष व अधिसूचित क्षेत्रात १.५० लक्ष रू. अर्थसाह्य देय आहे. ५०० घ. मी. तळ्यासाठी सर्वसाधारण क्षेत्रात ३० हजार व अधिसूचित क्षेत्रात ३७ हजार रू. अर्थसाह्य देय आहे.

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त ७५ हजार रू. साह्य दिले जाईल.

इच्छूकांनी महाडीबीटी पोर्टलवर सीएससी केंद्रामार्फत किंवा वैयक्तिकरीत्या ऑनलाईन नोंद करून योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

०००



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा