शांघाय येथे पुढील वर्षी आयोजन तरूणांना जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी
शांघाय येथे पुढील वर्षी आयोजन
तरूणांना जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये
सहभागी होण्याची सुवर्णसंधी
अकोला, दि. 22 : जागतिक कौशल्य स्पर्धेत
२३ वर्षांखालील तरूणांना कौशल्य सादरीकरणाची संधी मिळते. पुढील वर्षी ही स्पर्धा शांघाय
येथे होणार असून, कौशल्य विकास विभागातर्फे त्यासाठी नामांकने पाठविण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातून अधिकाधिक तरूणांनी सहभागी होण्याचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी
केले आहे.
ही स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. ही
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून ही जगभरातील
२३ वर्षाखालील तरुण सहभागी होतात. कौशल्य क्षेत्रातील ही ऑलिंपिक स्पर्धाच आहे. २०२६
मध्ये शांघाय येथे स्पर्धा होणार असून, त्याच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने जिल्हा, विभाग,
राज्य आणि देशस्तरावर स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धांतून निवडलेल्या गुणवान कौशल्यधारकांची
नावे जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत.
सर्व शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण
संस्था, एमएसएमई टूल रुम्स, सिपेट, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन
महाविद्यालये, हॉस्पिटिलिटी इन्स्टिट्यूट, कॉर्पोरेट टेक्निकल इन्स्टिट्यूट, स्किल
ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबीव्हीटी, खासगी कौशल्य
विद्यापीठ, इन्स्टिट्यूट ऑफ ज्वेलरी मेकिंग, इतर सर्व प्रशिक्षण संस्था, ,सर्व विद्याशाखांची
महाविद्यालये, सर्व कौशल्य प्रशिक्षण संस्था यांना स्पर्धेत सहभागात्मक योगदानासाठी
आवाहन करण्यात आले आहे.
सहायक आयुक्त श्री. शेळके म्हणाले की,
अकोला जिल्ह्यातील पात्र युवक- युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपल्या कौशल्यांचे
सादरीकरण करणे अपेक्षित आहे. वयोमर्यादा हा एकमेव निकष आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी
उमेदवाराचा जन्म दि. ०१ जानेवारी २००४ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे,
डिजीटल कन्स्ट्रक्शन, क्लाऊड कॉम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, आयसीटी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर,
इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजी, रोबोट सिस्टिम, एअरक्राफ्ट मेटेंनन्स या क्षेत्रांसाठी
उमेदवाराचा जन्म दि.०१ जाने २००१ किंवा तदनंतरचा असणे अनिवार्य आहे.
इच्छूकांनी नोंदणी https://www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर दि.३० सप्टेंबरपूर्वी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार
व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा