पशुपालकांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा
पशुपालकांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा
अकोला, दि. १९ : पशुधनाच्या आहार, उपचार, विमा आदी संगोपनासाठी किसान क्रेडिट कार्डाआधारे अल्पकालीन
कर्ज मिळते. या योजनेचा जिल्ह्यातील पशुपालक बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी
अजित कुंभार यांनी केले आहे.
पशुधनाचा आहार, वैद्यकीय उपचार, विमा, वीजपुरवठा, इन्व्हर्टर आदी बाबींसाठी
खेळते भांडवल म्हणून पशुधनावर १ लक्ष ६० हजार रू. पर्यंत अल्पकालीन कर्ज, तर शेतीवर
३ लक्ष रू. पर्यंत कर्ज मिळू शकते.
या योजनेत सहभाग घेण्यासाठी गरजू पशुपालकांना जनसमर्थ हे ऑनलाईन ॲपवरून
आपल्या बँकेला अर्ज करता येईल. त्यासाठी लवकरात लवकर किसान क्रेडिट कार्ड काढावे, असे
आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जगदीश बुकतारे यांनी केले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा