श्री गणेश विसर्जन मिरवणूकीनिमित्त वाहतूक मार्गात बदल

 

अकोला, दि. 29 : श्री गणेश विसर्जन मिरवणूकीनिमित्त अकोला शहर व अकोला – अकोट राज्य वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी वर्षा मीना यांनी जारी केला.

हा बदल खालील कालावधीत लागू राहील.

अकोला शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील वाहतूक दि. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि.7 सप्टेंबर 2025 चे सकाळी वाजेपर्यंतअकोला-अकोट या राज्य मार्गावरील वाहतूक दि.06 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि.7 सप्टेंबर 2025 चे सकाळी 12 वाजेपर्यंत तसेच अकोला-पारस फाटा ते बाळापूर मार्गावरील वाहतूक दि.6 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि.7 सप्टेबर चे सकाळी 12 वाजेपर्यंत.

अकोला शहर श्री विसर्जन मार्गावरील वाहतूक : डाबकी रोडकडून बसस्थानकाकडे जाणारी व मामा बेकरीकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग : भांडपूरा चौक, पोळा चौक, हरिहर पेठ, वाशीम बायपास, लक्झरी स्टँड, अशोक वाटिका मार्गे बसस्थानक अशी वळविण्यात येईल.

अकोला बसस्थानकाकडून हरिहरपेठेकडे जाणारी वाहतूक : निमवाडी पोलीस वसाहती समोरून वाशिम बायपास हरिहर पेठ अशी वळविण्यात येईल. रेल्वे उड्डाण पुलाकडून कोतवाली, लक्झरी बसस्टँडकडे जाणारी वाहतूक अग्रसेन चौक, जेल चौक मार्गे जाईल. लक्झरी बसस्थानकाकडून अकोट स्टँडकडे जाणारी वाहतूक अग्रसेन चौक मार्गे जाईल. सुभाष चौकाकडून गांधी चौकाकडे जाणारी वाहतूक दामले चौक, टॉवर चौक मार्गे जाईल.

अकोला – अकोट राज्य मार्गावरील वाहतूक

            अकोला ते अकोटकडे जाणारी वाहतूक व येणारी वाहतूक पर्यायी मार्गे : अकोला बसस्थानक, लक्झरी बसस्थानक, वाशिम बायपास, शेगांव टी पॉईंट, गायगाव, देवरी अकोट अशी जाईल. अकोला बसस्थानक ते म्हैसांग मार्गे दर्यापूर तसेच दर्यापूरकडे जाणारी व येणारी वाहतूक पर्यायी मार्गे : रेल्वे स्थानक चौक, सातव चौक, खरप टी पॉईंट, म्हैसांग या मार्गे  जाईल व येईल.

अकोला पारस फाटा – बाळापूर – खामगांव मार्गावरील वाहतूक

        अकोला ते बाळापूरकडे जाणारी व येणारी वाहतूक पर्यायी मार्गे : अकोला- पारस फाटा हायवे ट्रॅप कार्यालयाकडून जाईल व येईल. खामगांव ते पारस फाटा, पातूरकडे जाणारी व येणारी वाहतूक पर्यायी मार्गे : पारस फाटा, वाशिम बायपास चौक, मार्गे वळविण्यात येईल.

            अकोल्याहून खामगावकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गे : अकोला-पारस फाट्याजवळील रोशन धाबा येथून तपे हनुमान मंदिराजवळील डिव्हायडर बॅरेकेटींग पॉईंट पर्यंत वळविण्यात येईल. हे आदेश सर्व वाहनांना लागू राहतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा