उद्योगांपुढील अडचणी दूर करा जिल्हाधिका-यांचे निर्देश
उद्योगांपुढील अडचणी दूर करा
जिल्हाधिका-यांचे निर्देश
अकोला, दि. २९ : औद्योगिक वसाहत व विविध उद्योगांपुढील अडचणी दूर करण्याचे
निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी येथे दिले.
जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत उद्योग मित्र समितीची बैठक गुरूवारी झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
अकोला उद्योजक संघटनेचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे निकेश गुप्ता,
लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष पंकज बियाणी, महाव्यवस्थापक संतोष बनसोड, महावितरणचे कार्यकारी
अभियंता अजितसिंह दिनोरे, एमआयडीसी प्रशासनाचे अधिकारी व उद्योग संघटनांचे प्रतिनिधी
उपस्थित होते.
औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी
वीज, रस्तेदुरुस्ती, अतिक्रमण सामाईक सुविधा अशा विविध अडचणींची माहिती दिली. त्यांचे
तत्काळ निराकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी संबंधित यंत्रणांना
दिले. त्या म्हणाल्या की, कालमर्यादा निश्चित करून या अडचणींचे निराकरण व्हावे. एकच
बाब वारंवार सांगावी लागू नये. उद्योग वृद्धी व रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने उद्योगांपुढील
अडचणी वेळीच सोडविणे आवश्यक आहे.
000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा